www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सामान्य माणसांतील असामान्यत्वाचा गौरव करण्याची झी मीडियाची परंपरा कायम सुरु राहणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, दूरवर खेड्यापाड्यात सेवाभावी वृत्तीनं काम करणाऱ्या अशा रत्नांना ‘झी 24 तास अनन्य सन्मान’ देऊन गौरवण्यात आलं. झी २४ तासच्या या सकारात्मक उपक्रमाची केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या दिग्गजांनी प्रशंसा केली.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातत, दूरवर खेड्यापाड्यात सेवाभावी वृत्तीनं काम करणाऱ्या रत्नांना झी 24 तास अनन्य सन्मान पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. शुक्रवारी मुंबईतल्या ताज हॉटेलमध्ये झालेल्या-हदयस्पर्शी कार्यक्रमाचं प्रस्ताविक झी मीडियाचे सीईओ आलोक अग्रवाल यांनी केलं.
शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाची महती जगभर पोहचवणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि वनस्थळी ग्रामीण विकास केंद्राच्यामाध्यमातून गेली तीन दशकं सामाजिक काम करणाऱ्या निर्मला पुरंदरे यांना अनन्य सन्मान जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याहस्ते बाबासाहेब पुरंदरे यांना सन्नान देण्यात आला. तर झी २४ तासचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी निर्मलाताईंना पुण्यात त्यांच्या घरी जाऊन सन्मानित केलं.
अनन्य सन्मान शिक्षण पुरस्काराचे मानकरी ठरले वाशिमचे हिरामण इंगोले. मुंबईचे महापौर सुनील प्रभू आणि जी.डी. जाधव यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
तर सदानंद दाते आणि डॉ. रामदास कुंटे यांच्या हस्ते जगदीश खरे यांना अनन्य सन्मान शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
सांगलीचे संपतराव पवार हे अनन्य सन्मान पर्यावरण पुरस्कारचे मानकरी ठरले. जलसंपदा मंत्री सुनील तटकरे आणि फोरसाईट ग्रृपचे प्रमुख संदीप वासलेकर यांनी त्यांना सन्मानित केलं.
समाजसेवा क्षेत्रातील पुरस्कार सोलापूरच्या जीवनज्योती गटाला सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आणि ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यांनी प्रदान केला. तर कृषी क्षेत्रातला अनन्य सन्मान साताऱ्याचे ऋषीकेष ढाणे यांना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि ज्येष्ठ कवी ना.धो. महानोर यांनी पुरस्कार दिला.
माजी कसोटीपटू किरण मोरे आणि विधान परिषदेतले तावडे यांनी राजेश जाधव यांना अनन्य सन्मान क्रीडा पुरस्कारनं सन्मानित केलं. अनन्य सम्मान मनोरंजन आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते रमणसिंग पाटील यांना देण्यात आला.
मुंबईतल्या ताज हॉटेलमध्ये झालेल्या या बहारदार कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज, चित्रपट कलाकार, तसंच वेगवेगळ्या राजकीय पक्षातले नेते आवर्जून उपस्थित होते. झी २४ तासचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी आभार मानले.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.