www.24taas.com, मुंबई
गुजरात किंवा गुजरातच्या प्रगतीचा विषय काढताच राज्य सरकार नेहमीच नाक मुरडत असते. मात्र आता हेच राज्य सरकार गुजरातने राबवलेला पुनर्वसनाचा पॅटर्न राज्यामध्ये राबवणार आहे.
राज्यात विविध प्रकल्प सुरु असतांना अनेक ठिकाणी जमीन अधिग्रहण करतांना विरोध सहन करावा लागत आहे. तेव्हा गुजरात पॅर्टननुसार प्रकल्पग्रस्तांची जमीन घेत त्या मोबदल्यात त्याच मूळ जमिनीच्या बाजूची जमीन विकसित करत मूळ मालकाला परत दिली जाणार आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त विस्थापित होणार नाहीच उलट त्यांना प्रकल्पाचा फायदा होणार आहे. गुजरातच्या विकासामागे या नव्या पुर्नवसन पद्धतीचा मोठा वाटा आहे.
राज्यात विरार ते अलिबाग असा सुमारे ९००० कोटी रुपयांचा आणि तब्बल १२६ किलोमीटर लांबीचा बहुमार्ग, बहुउद्देशीय वाहतूक प्रकल्प राबवला जाणार आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात जमीन अधिग्रहण करावे लागणार आहे. त्यासाठी पुर्नवसनाचा गुजरात पॅटर्न राबवला जाणार असल्याचं एमएमआरडीएचे आयुक्त राहूल अस्थाना ह्यांनी सांगितलं.