स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोडांवर मिळालेली ही संधी सोडण्यास विरोधकही सरसावले आहेत. या आंदोलनाचं नेतृत्व करण्याची संधी साधत २१ तारखेपासून राज्यात दिंडी आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी दिला. त्यापाठोपाठच कापसासाठी १९ तारखेपासून रस्त्यावर उतरणार असल्याचं सांगत भाजपानंही यात उडी घेतली.
ऊस आंदोलनानं तोंड पोळलेलं असताना, निवडणुकांच्या तोंडावर पेटलेल्या कापूस आंदोलनानं सरकारची धवापळ सुरु झालीय. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह
ऊसाच्या प्रश्नाचा फटका पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला बसू नये, यासाठी तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांना पुढाकार घ्यावा लागला होता. तसा कापूस आंदोलनासाठी काँग्रेसला घ्यावा लागणार आहे. अन्यथा विदर्भ, मराठवाड्यात याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. तर यानिमित्तानं विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात सरकारविरोधी रण पेटवण्याचा शिवसेना-भाजपचा प्रयत्न आहे.