गोव्याइतकेच महाराष्ट्रात हवे पेट्रोल दर- सेना

गोव्याप्रमाणे महाराष्ट्रातही पेट्रोलचे दर कमी करावेत अशी मागणी शिवसेना आमदार रामदास कदम यांनी केली आहे. नुकत्याच सादर केलेल्या बजेटमध्ये गोवा सरकारनं पेट्रोलवरचा व्हॅट कमी केला आहे. त्यामुळं गोव्यात पेट्रोलचे दर ११ रुपयांनी कमी झाले आहेत.

Updated: Mar 27, 2012, 05:58 PM IST

www.24taas.com, मुंबई

गोव्याप्रमाणे महाराष्ट्रातही पेट्रोलचे दर कमी करावेत अशी मागणी शिवसेना आमदार रामदास कदम यांनी केली आहे. नुकत्याच सादर केलेल्या बजेटमध्ये गोवा सरकारनं पेट्रोलवरचा व्हॅट कमी केला आहे. त्यामुळं गोव्यात पेट्रोलचे दर ११ रुपयांनी कमी झाले आहेत.

गोव्यातील  भाजपचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पेट्रोलचे दर कमी करण्याची घोषणा केली आहे. २ एप्रिलपासून पेट्रेलवर फक्त ०.१ %  एवढाच वॅट असेल. सध्या गोव्यामध्ये पेट्रोलवर २० % वॅट भरावा लागत आहे. यामुळे सध्या ६६ रुपये प्रति लीटरने मिळणारं पेट्रोल ५५ रुपये प्रति लीटरने मिळणार आहे.

पर्रिकर यांनी एअरलाइन्स कंपन्यांनाही दिलासा दिला आहे. गोव्यात हवाई इंधनावरील वॅट २२% वरुन ११ टक्क्यांवर आणण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे एरलाइन्स आता गोवा एअरपोर्टवर स्वस्तात इंधन भरू शकतील.