'पास' कोण 'नापास'? राज करणार 'तपास'

मनसेची मुंबई महापालिकेच्या निवडणूकीसाठी घेण्यात आलेली परीक्षा हा सगळ्यांचाच चर्चेचा विषय ठरला होता.. आता लवकरच या साऱ्याच परीक्षा दिलेल्या उमेदवारांना आपलं पुढील भवितव्य काय असणार हे स्पष्ट होईल.

Updated: Dec 18, 2011, 12:05 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

मनसेची मुंबई महापालिकेच्या निवडणूकीसाठी घेण्यात आलेली परीक्षा हा सगळ्यांचाच चर्चेचा विषय ठरला होता.. आता लवकरच या साऱ्याच परीक्षा दिलेल्या उमेदवारांना आपलं पुढील भवितव्य काय असणार हे स्पष्ट होईल. कारण की या परीक्षेचा निकाल हा अंतिम टप्प्यात आलेलं आहे. तेव्हा लवकरच समजेल की कोण पास आणि कोण नापास...

 

आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसेच्या इच्छुकांनी दिलेल्या उमेदवारीच्या परीक्षेचा निकाल लवकरच लागणार आहे. राज ठाकरेंनी नाशिकमध्ये ही माहिती दिली आहे. लेखी परीक्षेचे पेपर तपासण्याचे काम अंतिम टप्प्यात आलं असून लवकरच निकाल जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितल आहे. २६ डिसेंबरपासून परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांची मुलाखत घेणार असल्याचंही राज यांनी सांगितलं आहे.

 

साडेतीन हजार इच्छुकांनी मनसेची ही लेखी परीक्षा दिली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर महापालिका क्षेत्रांसाठी ही परीक्षा झाली होती. पास झालेल्या उमेदवारांच्याच मुलाखती घेण्यात य़ेतील असंही राज ठाकरे यांनी सांगितलं. शिवाय या मुलाखतींच्या निमित्तानं राजकीय दौऱ्याला सुरुवात होणार असल्याचं राज यांनी सांगितलं