www.24taas.com, मुंबई
मंत्रालयाला लागलेल्या आगीत सुमारे 5 लाख 86 हजार फाईल्स आणि साडे सोळा लाख इतर दस्तावेज जळाल्यात. त्यामध्ये अनेक महत्त्वाच्या आणि गोपनिय फाईल्स तसंच इतर दस्ताऐवजांचा समावेश आहे. आगीची सुरुवात चौथ्या मजल्यावरच्या नगरविकास खात्याच्या सर्व्हर रुममधून झाली होती.
'झी 24 तास'च्या हाती मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील जळालेल्या रेकॉर्ड रुमची छायाचित्रे लागले आहेत. यामध्ये नगरविकास खाते आणि गृह खात्यांच्या फाईल्सचे रेकॉर्डस जळून खाक झाल्याचं स्पष्ट दिसतंय.
आगीत नेमक्या किती फाईल्स जळाल्या याचा नेमका अंदाज येत नाहीय. तसंच फाईल्सच्या मिरर इमेजेस घेणारी सर्व्हर मंत्रालयाबाहेर सुरक्षित असल्याचं सांगण्यात येतंय. पण तरीसुद्धा जळालेल्या फाईल्सचा डेटा रिकव्हर करणे कठिण असल्याचं मत तज्ज्ञ व्यक्त करतायत.