www.24taas.com, मुंबई
मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी सध्या कोरडं आयुष्य जगत आहेत. कुठल्याही प्रकारची पाणी मिळण्याची साधनं उपलब्ध नसल्यामुळे मिळेल त्या पाणवठ्यावर चिखलाचं पाणी भरावं लागतं.
मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सुमारे 3000 आदिवासी सध्या कोरडं आयुष्य जगतायत... जंगलातील बिबटे, माकडं यांसारखी जनावरं याच पाणवठ्यावर पाणी प्यायला येतात... ही जनावरं ज्या जागी पाणी पितात त्याच पाणवठ्यावर दिवसा जिव मुठीत घेउन चिखल मिश्रीत पाणी आदिवासी महिला आपल्या कळशीत भरतात...
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 11 आदिवासी पाडे आहेत... सुमारे 3000 आदिवासी या पाड्यांमध्ये राहतात... मुंबईमध्ये राहुनसुद्धा त्यांच्या घरात अजुनही विजेचा प्रकाश पडलेला नाही... त्यामुळे पाण्यासाठी त्यांना वर्षभर पायपीट करावीच लागते... कुठल्याही प्रकारची पाणी मिळण्याची साधनं उपलब्ध नसल्यामुळे मिळेत त्या पाणवठ्यावर चिखलाचं पाणी भरावं लागतं... हे चिखलालचं पाणी नाईलाजानं लहान मुलांना सुद्धा प्यावं लागतं...
हांडाभर अस्वच्छ पाण्यासाठी सुद्दा ह्यांना 2 किलोमिटर पायपीट करावी लागते...त्यामुळे नळांना धोधोपाणी असणा-या मुंबईची ही एक कोरडी बाजू ...