यासिन भटकळ सुत्रधार सीरियल बॉम्बस्फोटचा

मुंबईत १३ जुलैच्या सीरियल बॉम्बस्फोटां प्रकरणी सहा महिन्यांनी पोलिसांना सुगावा लागला आहे. या बॉम्बस्फोटांबद्दलच्या संशयाची सुई यासिन भटकळकडे वळते आहे. इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी यासिन भटकळ १३ जुलैला मुंबईतच होता. आणि त्यानंच दादरमधला कबुतरखाना, झवेरी बाजार आणि ऑपेरा हाऊसमधले स्फोट घडवल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

Updated: Jan 2, 2012, 02:27 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

मुंबईत १३ जुलैच्या सीरियल बॉम्बस्फोटां प्रकरणी सहा महिन्यांनी पोलिसांना सुगावा लागला आहे. या बॉम्बस्फोटांबद्दलच्या संशयाची सुई यासिन भटकळकडे वळते आहे. इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी यासिन भटकळ १३ जुलैला मुंबईतच होता. आणि त्यानंच दादरमधला कबुतरखाना, झवेरी बाजार आणि ऑपेरा हाऊसमधले स्फोट घडवल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

इंडियन मुजाहिद्दीनचे दहशतवादी रियाज भटकळ आणि इक्बाल भटकळ पाकिस्तानात आहेत. त्याचवेळी त्यांचा आणखी एक साथीदार यासिन भटकळ हा बॉम्बस्फोटांदरम्यान मुंबईतच होता, असा सुगावा पोलिसांना लागला आहे. मोबाईल रेकॉर्डसमधून ही माहिती मिळाली आहे. यासिन दिल्ली पोलिसांच्या हातून निसटला होता. त्यानंतरच त्यानं हे बॉम्बस्फोट घडवून आणले असावेत, असा अंदाज आहे.

इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेनं आता नेपाळमध्ये आपला जम बसवायला सुरुवात केली आहे. नेपाळमधल्या भूतहा इथं आपला नवा अड्डा केल्याचं सांगितलं जातं आहे. मोस्ट वॉन्टेड असलेल्या शाहरुखनंच ही कबुली दिली आहे. विशेषतः २००८ नंतर इंडियन मुजाहिद्दीननं आपला मोर्चा नेपाळकडे वळवला. या दहशतवादी संघटनेनं इथं एक मोठ नेटवर्क तयार केलं आहे.