www.24taas.com, मुंबई
लालकृष्ण अडवाणी यांनी केलेल्या टीकेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही भाजपवर हल्लाबोल केलाय. पेट्रोल दरवाढीवर भारत बंद हे उत्तर आहे काय, असा सवाल त्यांनी विचारला आहे. संसदेत विरोधक या मुद्द्यावर निष्प्रभ ठरत असल्याची टीकाही त्यांनी केलीय.
पेट्रोल दरवाढीवर विरोधकांकडे पर्यायी उत्तर आहे काय, अशी विचारणा राज ठाकरे यांनी केली. यानिमित्तानं अडवाणींच्या वक्तव्याचाही दाखला दिलाय. थोडक्यात पेट्रोल दरवाढीनंतर भारत बंदच्या निमित्तानं भाजप आणि मनसे आमने सामने उभे ठाकले आहेत.
याचबरोबर, ताडोबाचा दौरा करुन परतलेल्या राज ठाकरेंनी वाघांच्या शिका-यांवरच निशाणा साधला. शिका-यांची शिकार करणा-या अधिका-यांना मनसेतर्फे पाच लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा त्यांनी केली. तसंच शिका-यांची माहिती देणा-याला 2 लाख रुपये दिले जाणार आहेत. पतंगरावांना वनखात्यात रस नाही. त्यामुळेच वनखात्याची दूरवस्था झाल्याचा आरोपही केला.