राज यांच्या निकालला सरकारचे आव्हान नाही – आर. आर.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधातील प्रकरण रद्द करण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान देणार नसल्याचे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी स्पष्ट केले आहे. २००८ मध्ये विक्रोळीतील प्रचार सभेत उत्तर भारतीयांविरूद्ध वक्तव्य केल्याचा आरोप राज ठाकरे यांच्यावर होता. या प्रकरणात राज ठाकरे यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

Updated: Feb 23, 2012, 09:51 PM IST

www.24taas.com, मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधातील प्रकरण रद्द करण्याच्या  मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान देणार नसल्याचे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी स्पष्ट केले आहे. २००८ मध्ये विक्रोळीतील प्रचार सभेत उत्तर भारतीयांविरूद्ध वक्तव्य केल्याचा आरोप राज ठाकरे यांच्यावर होता. या प्रकरणात राज ठाकरे यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

राज ठाकरे यांच्या विरोधात सक्षम प्रकरण बनत नसल्याने आम्ही हायकोर्टाच्या निकालाला आव्हान देणार नसल्याचे आर. आर. पाटील यांनी स्पष्ट केले.  यापूर्वी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यापूर्वी  पोलिसांनी राज्य सरकारची परवानगी घेणे आवश्यक होते. तशी परवानगी घेतली नसल्याने हे प्रकरण रद्द करण्यास कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले होते.

विक्रोळीच्या सभेत राज ठाकरे यांनी अबू आझमी यांच्या वक्तव्याचा समाचार घेत म्हटले होते की, त्यांनी जर अबू आझमी लाठ्या काठ्या वाटण्याच्या गोष्टी करेल तर मी मराठी तरूणांना तलवारी वाटेल. या प्रकरणावरून पोलिसांनी राज ठाकरे विरोधात गुन्हा दाखल केला होता.

Tags: