राहुल गांधीचे शेजारी होण्यास सचिनचा नकार

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने खासदारकीची शपथ घेतल्यानंतर दिल्लीत काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांचा शेजारी होण्याच्या हालचाली सुरू केली होती. मात्र, सचिन तेंडुलकरने आपल्याला हा बंगला नको, असे स्पष्ट केले. त्यामुळे राहुल गांधी यांचा शेजारी होण्याची शक्यता आता मावळली आहे.

Updated: Jun 9, 2012, 04:58 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

दिल्लीमध्ये सरकारी बंगला घेण्यास नकार दिला आहे. कर भरणाऱ्या नागरिकांचा पैसा वाया घालविण्याची माझी इच्छा नसल्याचे, सचिन तेंडुलकरने स्पष्ट केले आहे. मास्टर ब्लास्टर सचिनने खासदारकीची शपथ घेतल्यानंतर  दिल्लीत काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांचा शेजारी होण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, सचिन तेंडुलकरने आपल्याला हा बंगला नको, असे स्पष्ट केले. त्यामुळे राहुल गांधी यांचा शेजारी होण्याची शक्यता आता मावळली आहे.

 

सचिनसाठी तुघलक लेनमधील हा पाच नंबरचा बंगला सात हजार स्कवेअर फूटमध्ये बांधण्यात आला आहे.  या बंगल्यात एक मोठा बगीचा आहे. तर विश्रांतीसाठी बंगल्यात सात बेडरूमही आहेत. सचिनचे किर्ती आणि कर्तुत्व मोठे असल्याने त्याला सुरक्षाही तशीच देणे आवश्यक आहे. त्यामुळेच सचिनला विशेष अशी झेड प्लस सुरक्षा देण्यात येणार आहे, अशी माहिती गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिली होती.

 

मात्र, सचिनने स्वत:हून सरकारी बंगल्याचा इन्कार केल्याने आता हा बंगला कोणाला मिळेल याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, सचिन  सुट्टी घेऊन लंडनला गेला आहे. लंडनमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत सचिन गेल्याने या बंगल्याबाबत त्यांने कोणताही निर्णय घेतलेला नाही. लंडनवरून सुट्टी संपल्यानंतर याबाबत ठोस निर्णय घेण्याची शक्यता आहे. मात्र, आपल्याला हा बंगला नको, अशी सचिनने माहिती दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. आपला सरकारवर कोणत्याही प्रकारचा बोजा नको, यासाठी सचिनने हा निर्णय घेचल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले आहे.

 

माझी कोणत्याही शासकीय बंगल्यामध्ये राहण्याची इच्छा नाही. कारण, माझे दिल्लीतील वास्तव्य फार दिवस असणार नाही. त्यामुळे माझी कर भरणाऱ्या नागरिकांचे पैसे बंगल्याच्या निगराणीसाठी वाया घालविण्याची इच्छा नाही. या बंगल्यात राहण्यापेक्षा मी दिल्लीत आल्यानंतर माझ्या पैशाने एखाद्या हॉटेलमध्ये राहण्यास प्राधान्या देईल. राज्यसभेत खासदार म्हणून माझी निवड करणे, हे माझ्यासाठी खूप मोठे आहे, असे सचिन म्हणाला.

 

[jwplayer mediaid="117422"]