स्वातंत्र्यसेनानी मोहाडीकर यांचे निधन

स्वातंत्र्यसेनानी प्रकाश मोहाडीकर यांचे आज शनिवारी दादर येथील राहत्या घरी निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल सर्वच क्षेत्रातून दु:ख व्यक्त होत आहे.

Updated: May 19, 2012, 09:46 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

स्वातंत्र्यसेनानी प्रकाश मोहाडीकर यांचे आज शनिवारी दादर येथील राहत्या घरी निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल सर्वच क्षेत्रातून दु:ख व्यक्त होत आहे.

 

ज्येष्ठ समाजवादी नेते आणि सानेगरुजी यांचे ते सहकारी होते.  मुंबईचा समाजवादी चेहरा अशी ओळख असलेले मोहाडीकर १९६७ मध्ये शिक्षक मतदार संघातून विधान परिषदेवर निवडून गेले होते. गांधीवादी, समाजवादी विचारसरणीचे ते पुरस्कर्ते होते.

 

साने गुरुजींच्या विचारांचा प्रसार होण्यासाठी त्यांनी राज्यभर प्रचार दौरा केला आणि महाराष्ट्रात साने गुरूजींचे विचार रूजवण्यात मदत केली. दादर येथील राहत्या घरी आज सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव दादरमधील साने गुरुजी विद्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. उद्या सकाळी ८ ते ८.३०दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

मोहाडीकरांचा अल्प परिचय

जळगाव जिल्हातल्या अमळनेरमध्ये 9 जानेवारी 1919 ला त्यांचा जन्म झालाय  कट्टर टिळकपंथी कुटूंबात त्यांचा जन्म झाला. त्यांना सुरूवातीपासूनच सानेगुरूजींचा सहवास लाभला होता. साने गुरूजींकडून मिळालेले संस्कार हा प्रकाशभाईच्या आयुष्यातला अमुल्य ठेवा...खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे सांगत ज्ञानखंडाचा अखंड वसा त्यांनी घेतला होता.

 

माय माऊली साने गुरूजी हे पुस्तक मोहाडीकर यांनी लिहीलं होतं. प्रकाशभाई म्हणजे अजोड देशभक्ती आणि ज्ञानसाधनेचा अपूर्व संगम...  त्यांना वय मान्य होतं पण म्हातारपण मानय नव्हत. वयानुरूप शरीराची बदलत जाणारी अवस्था त्यांना मान्य होती, पण राम त्यांना कधीच मान्य नव्हता. त्यामुळं पहाटे चारपासून रात्री दहापर्यंत ते सतत कार्यरत असायचे. या वयातही त्यांची उर्जा थक्क करणारीच होती. आपण नव्वदीतला तरणाताठा मुलगा हे असं ते म्हणायचे.

 

प्रकाशभाईंचं मुळं नाव लक्ष्मण होतं.  पण स्वातंत्र्य लढ्याचं कार्यक्षेत्र म्हणून त्यांनी नाशिकची निवड केली होती. त्यावेळी त्यांनी प्रकाश शहा हे नाव घेतलं आणि तेव्हापासूनच सगळ्यांना लक्ष्मण या नावचा विसर पडला. 1962 मध्ये लोकांच्या पाठिंब्याने प्रकाशभाई मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणऊन निवडून आले. बाबा आमटेंच्या संस्थेला त्यांनीसाडेचार लाखआंचा निधी दिला