ABVP कार्यकर्त्यांचा राडा!

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नागपूर विद्यापीठाची सिनेटची बैठक उलथवून लावण्याचा प्रयत्न केला

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jul 19, 2013, 05:28 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नागपूर विद्यापीठाची सिनेटची बैठक उलथवून लावण्याचा प्रयत्न केला. देशमुख चौकशी समितीच्या अहवालानुसार विद्यापीठानं बंदी घातलेल्या 250 महाविद्यालयांची बंदी कायम ठेवावी.
तसंच सिनेटच्या बैठकीमध्ये याविषयावर चर्चा घेऊनच निर्णय घ्यावा अशी अभाविपची मागणी होती. मात्र विद्यापिठानं ही बंदी एकतर्फी पद्धतीनं रद्द केली असा आरोप करत अभाविपच्या कार्यकर्त्यांनी सिनेटची बैठक उलथवून टाकण्याचा प्रयत्न केला.
मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला. मागणी मान्य न झाल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आभाविपच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.