`राजकीय पक्षांचा काळा पैसा पांढरा करण्याचा उद्योग`

नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी या दोघांपैकी कुणीही पंतप्रधान झाले तरी देशाचे प्रश्न सुटणार नाहीत असा टोला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलाय. काळा पैसा पांढरा करण्याचा उद्योग सर्वच राजकीय पक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 17, 2013, 01:35 PM IST

www.24taas.com, नागपूर
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी या दोघांपैकी कुणीही पंतप्रधान झाले तरी देशाचे प्रश्न सुटणार नाहीत असा टोला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलाय. काळा पैसा पांढरा करण्याचा उद्योग सर्वच राजकीय पक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
कॅगच्या अहवालातील कर्जमाफीचा पैसा सत्ताधार्यांनी लाटला असून या घोटाळ्याचे आपल्या कडे पुरावे असल्याचा खळबळजनक खुलासा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज नागपुरात केला. सरकारला या संबंधी आपण पत्र लिहणार असून पुरावे मागितल्यास आपण ते सरकारला सदर करू शकतो, असेही ते म्हणाले.

या प्रकरणातील लाभार्थींना विचारल्यास ते याचे खरे काय ते नाक्कीस सांगतील, असे देखील अण्णा म्हणाले. हा दुष्काळ नैसर्गिक नसून मानवनिर्मित असल्याचा आरोप लावताना, राज्य सरकारने राज्याच्या ६५ वर्षाच्या इतिहासात या करता उपाय योजना केल्या नसल्याने हि परिस्थिती उद्भवली असल्याचेही ते म्हणाले.