चंद्रपूर : चंद्रपूरमधील वरोरा मतदारसंघाचे शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी एका तलाठ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आणि शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
विशेष म्हणजे आपल्या मर्जीतील वाळू तस्करावर कारवाई केल्याच्या रागातून आमदारांनी ही धमकी दिल्याचं समजतय. आमदार बाळू धानोरकर यांनी त्यांच्या मर्जीतल्या वाळू तस्करांवर तलाठ्याने कारवाई केली म्हणून त्याला घरी बोलावून जीवे मारण्याची धमकी दिली.
वरोरा तालुक्यातील चारगाव खुर्द येथे कार्यरत एकनाथ गाडेकर असं तक्रारकर्त्या तलाठ्याचे नाव आहे. गाडेकरांनी आमदारा साहेबांसोबतचं हे सर्व संभाषण मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्यामुळे आमदारांविरोधात पोलिसांना सज्जड पुरावा मिळालाय.