www.24taas.com , झी मीडिया, नागपूर
रेल्वेनं प्रवास करतांना आपल्या सीटवर झुरळ आढळलं तर... नेहमीच्या प्रवासात झुरळांचं राज्य अनेक एक्स्प्रेस गाड्यांवर पाहायला मिळतं. असाच काहीसा अनुभव मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसच्या प्रवाशांना आला. झुरळांच्या हल्ल्यानं त्रस्त झालेल्या प्रवाशांना त्यांच्यापासून मुक्ती तर मिळाली नाहीच, पण त्यामुळं गाडी मात्र रोखली गेली.
मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसवर झुरळांनी आक्रमण केलं. त्यांच्या या आक्रमणामुळं गाडी तब्बल ५० मिनिटं गाडी रोखली गेली. प्रवाशांच्या तक्रारीमुळं अवघ्या रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली. विनंती केल्यानंतर अखेर मुंबईहून नागपूरकडे निघालेली ही गाडी निघाली. सकाळी नागपूरला पोहोचताच गाडीची स्वच्छता करण्यात आली.
यापुढं गाडीत झुरळ आढळणार नाही, असं आश्वासन रेल्वे प्रशासनानं दिलंय. यापूर्वीही दुरांतोच्या स्वच्छतेबद्दल अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. तर, तीन महिन्यांपूर्वी राजधानी एक्स्प्रेसही झुरळांनी रोखून धरली होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.