अकोला : मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना अकोल्यात घडलीये. २ मित्रांनी आपल्याच्या मित्राच्या मानसिक रुग्ण असलेल्या बहिणीवर बलात्कार केलाय.
युवक आपल्या 35 वर्षीय बहिणीसह राहत होताय. गेल्या काही दिवसांपासून या युवकाच्या बहिणीवर मानसिक आजाराचे उपचार सुरु आहेत. वडिलांचे छत्र हरवलेल्या या भावंडांची आई मागच्याच वर्षी मरण पावली.
१ जानेवारी म्हणजेच शुक्रवारच्या रात्री हा युवक आपल्या औन्प उर्फ मुन्ना परिहार आणि चंद्रकांत निलाखे या जिवलग मित्रांसह मद्यप्राशन करून घरी आला. यावेळी घरासमोर उभे असतांना आरोपी असलेल्या दोघांनी पिडीत युवतीच्या भावाला घरी जेवण आहे का?, असे विचारले... पण, घरी जेवण नसल्यामुळे पिडीतेचा भाऊ या मित्रांसाठी नाश्ता आणण्यासाठी गेला. याचवेळी या दोन नराधमांनी घरी एकटी असलेल्या या युवकाच्या बहिणीवर बलात्कार केला.