www.24taas.com, नागपूर
हैदराबाद बॉम्ब स्फोटाचा तपास प्राथमिक स्तरावर आहे. त्यामुळे त्याच्या ‘महाराष्ट्र कनेक्शन’विषयी आताच सांगता येणार नाही. पण तपास अधिकाऱ्यांना महाराष्ट्र सरकारकडून सर्वोतोपरी सहकार्य केलं जाईल, असं आश्वासन महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिलंय. भटकळ बंधू हे देशाबाहेर असल्याने त्यांच्या अटकेसाठी अडचणी येत असल्याचंही आर. आर. पाटील यांनी म्हटलंय. या संदर्भात महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार एकमेकांशी सातत्यानं संपर्कात आहेत.
युद्धपातळीवर स्फोटाचा तपास
> महाराष्ट्रातही अनेक भागात विशेष तपास पथक रवाना
> अहमदनगरमधील मुकूंदनगर परिसर
> नांदेडमधील देगलूर नाका, पीर बुरहाननगर
> बीडमधील हिमायत बाग परिसर, हरसूल भाग
> राज्यातील श्रीरामपूर, संगमनेर, जालना परिसरातही तपास
> आंध्र पोलिसांकडून ११ पथकांची स्थापना
> ६ ते ७ जणांनी स्फोट घडवून आणल्याची माहिती
> घटनास्थळी टायमर सापडला मात्र, डिटोनेटर मोबाईल किंवा रसायनांचा वापर झाल्याची खात्री नाही
> घटनास्थळावर आरडीएक्स सापडलं नाही
> सगळी सायकल दुकाने आणि लॉजची तपासणी