कारागृहांच्या सुरक्षेसाठी राज्यसरकारची कठोर पावलं

राज्यातल्या मध्यवर्ती कारागृहांच्या सुरक्षेसाठी राज्यसरकारनं कठोर पावलं उचलली आहेत. इजरायल सरकारच्या मदतीनं त्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प राबवण्यात येतोय. 

Updated: Jul 14, 2016, 08:24 PM IST
कारागृहांच्या सुरक्षेसाठी राज्यसरकारची कठोर पावलं title=

नागपूर : राज्यातल्या मध्यवर्ती कारागृहांच्या सुरक्षेसाठी राज्यसरकारनं कठोर पावलं उचलली आहेत. इजरायल सरकारच्या मदतीनं त्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प राबवण्यात येतोय. 

मध्यवर्ती कारागृहांमध्ये सेंसर, सीसीटीव्ही कॅमेरे आणि श्वानपथकासारखे उपाय योजले जाणार आहेत. इजरायलच्या तुरुंगांमधल्या सरुक्षेच्या धर्तीवर राज्यातल्या तुरुंगांमध्येही सुरक्षा व्यवस्था राबवली जाणार आहे. नागपूरमध्ये या प्रकल्प पथकानं भेट दिली. नागपूर, येरवडा, आर्थर, कोल्हापूर, नाशिक आणि राज्यातल्या इतर कारागृहांमध्ये ही सुरक्षा व्यवस्था राबवली जाणार आहे. कारागृहांमधून कैदी पळून जाण्याच्या घटना थांबवण्यासाठी अशी पाच स्तरांची सुरक्षा व्यवस्था राबवण्यात येणार आहे.