वऱ्हाडाच्या ट्रकला एसटीची धडक, चार ठार

लग्नाच्या वऱ्हाडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात चार जणांनी आपला जीव गमावलाय. 

Updated: Jul 12, 2016, 04:16 PM IST
वऱ्हाडाच्या ट्रकला एसटीची धडक, चार ठार title=

अकोला : लग्नाच्या वऱ्हाडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात चार जणांनी आपला जीव गमावलाय. 

बुलडाणा जिल्ह्यातील धामणगाव बढे इथं ही घटना घडलीय. एका लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रकला एका एसटीनं धडक दिली... आणि हा अपघात घडला. 

या अपघातात चार जणांचा बळी गेलाय तर २० जण जखमी झालेत. यापैंकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.  

अकोला आगारातून अंबडच्या दिशेनं ही बस निघाली होती.