www.24taas.com, झी मीडिया, ग़चिरोलीन
गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत. कुरखेडा तालुक्यातल्या झरी गावातल्या जंगलात ही घटना घडलीय. काल रात्री नक्षलविरोधी अभियानादरम्यान नक्षलवाद्यांनी भूसुरूंगाचा स्फोट घडवून आणला.
कुरखेडा जंगल परिसरात विशेष कृती दलाचे जवान जीपने गस्त घालीत होती. मात्र, त्याआधीच नक्षलवाद्यांनी झरी गावातल्या जंगलात भूसुरुंग पेरून ठेवले होते. त्यात हे विशेष कृती दलाचे जवान शहीद झाले आहेत. ग्यारापट्टी पोलीस हद्दीत ही घटना घडली आहे.
नक्षलवाद्यांनी सरकारी यंत्रणांना लक्ष करण्याचे धोरण अवलंबिले आहे. २००९मध्येही असाच हल्ला नक्षलवाद्यांनी घडवून आणला होता.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.