अकोला : महाराष्ट्राचे तुकडे करण्याची भाषा करणारे अॅड. श्रीहरी अणे यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्यात आलाय. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध करताना घोषणाबाजी केली. दरम्यान, जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करण्यात आला.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रात अॅड. श्रीहरी अणे मार्गदर्शन करीत होते. यावेळी सेना कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. यावेळी ५० ते ६० शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
विदर्भ राज्य परिषदेमध्ये श्रीहरी अणे उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. त्यावेळेस शिवसेना कार्यकर्त्यांनी पोलीस संरक्षण झुगारून सभागृहात प्रवेश केला आणि गोंधळ घातला. त्यामुळे तणाव वाढला. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.