इक्बाल शेखला ठेचणाऱ्या नागरिकांची न्यायालयासमोर दगडफेक

नागपुरात संतप्त जमावानं जिल्हा न्यायालयासमोर दगडफेक केलीय. नागपुरातल्या वसंतराव नाईक झोपडपट्टीतले हे नागरिक आहेत. पोलिसांनी न्यायालयात जाण्यास मज्जाव केल्यानं संतप्त झाल्यानं या नागरिकांनी दगडफेक केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 4, 2013, 03:32 PM IST

www.24taas.com, नागपूर
नागपुरात संतप्त जमावानं जिल्हा न्यायालयासमोर दगडफेक केलीय. नागपुरातल्या वसंतराव नाईक झोपडपट्टीतले हे नागरिक आहेत. पोलिसांनी न्यायालयात जाण्यास मज्जाव केल्यानं संतप्त झाल्यानं या नागरिकांनी दगडफेक केलीय.
संबंधित नागरिकांनी ९ ऑक्टोबर २०१२ मध्ये दोन झोपडपट्टीदादांना दगडाने ठेचून ठार केलं होतं. यात इक्बाल शेख याचा मृत्यू झाला होता. तर दुसरा भुऱ्या शेख पळून जाण्यात यशस्वी झाला होता. त्यानंतर पोलिसांच्या तावडीत तो सापडला होता. भुऱ्यानं यापूर्वी केलेल्या खून प्रकरणी त्याच्यावर नागपूरच्या जिल्हा न्यायालयात खटला सुरु आहे. याच खटल्याची आज सुनावणी होती.

या सुनावणीसाठी झोपडपट्टीवासियांना पोलिसांनी न्यायालयात जावू दिलं नाही. त्यामुळं जमाव संतापला. अटक झालेल्या झोपडपट्टी दादाला फाशी द्यावी अशी मागणी करीत जिल्हा न्यायालयाबाहेर दगडफेक केली. दगडफेकीत पोलिसांच्या एका जीपचंही नुकसान झालंय.