www.24taas.com, झी मीडिया, बुलढाणा
पाणी पुरी म्हटलं कि प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. मात्र बुलढाणा शहरात पाणीपुरीबाबत एक किळसवाणा प्रकार उघडकीस आलाय. शहरात पाणी पुरी तयार करणारी ही व्यक्ती पूरी बनवण्याचं कणीक चक्क पायानं तुडवताना आढळला.
तो ज्या घरात राहत होता त्याचा ठिकाणी तो या पु-या बनवतोय. पाहटे ५ वाजेवापासून तो पाणी पुरी तयार करतो.. पायानं कणीक मळून झाल्यानंत तो त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून त्यांच्या पु-या तयार करतो. आणि त्याच पु-या ग्राहकांना खायला देतो...
पाणी पुरी म्हटलं कि प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते. परंतु बुलढाणा शहरातील उत्तर प्रदेशाच्या गोविंदाचा पाणी पुरी तयार करण्याचा प्रकार बघितल्यावर कदाचितच कोणी पाणी पुरी खाणार नाही.
बुलढाणा शहरामध्ये गेल्या एक महिन्या अगोदर उत्तर प्रदेशातील गोविंद नामक युवकाने पाणी पुरीचा व्यवसाय सुरु केला. तो ज्या घरात राहत होता त्याचा ठिकाणी पाहते ५ वाजेवापासून तो पाणी पुरी तयार करत असे परंतु त्यांच्या घराजवळ राहणार एका युवकाने तो पाणी पुरी तयार करत असतांना त्याचे चित्रीकरण केले. ते बघितल्यावर ही पाणी पुरी खावी की नाही असा प्रश्न प्रत्येकाला पडेल. पुरी तयार करण्यासाठी जी कणिक आहे ती तो चक्क पायाने तुडवतो. त्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून त्याची पुरी तयार करतो. आणि तीच पुरी तो ग्राहकांना खायला देतो.
याबाबत त्याला विचारणा केली असता ज्या प्रमाणे इतर लोक पाणी पुरी तयार करता त्याच प्रमाणे आपण सुद्धा हाताने पुरी तयार करत असल्याच तो सांगतो. त्यामुळे पाणीपुरीसाठी पुरी कशाप्रकारे बनवली जाते हे आपल्याला समजू शकतं.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.