दरोडा आणि हत्येप्रकरणी ६ जणांना अटक

पाथर्डी गावातील मोंढे वस्तीवर १ नोव्हेंबर रोजी पडलेल्या दरोड्या प्रकरणी ६ जणांना १६ तारखे पर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 11, 2013, 10:01 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, धुळे
पाथर्डी गावातील मोंढे वस्तीवर १ नोव्हेंबर रोजी पडलेल्या दरोड्या प्रकरणी ६ जणांना १६ तारखे पर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. संपत मोरे यांच्या घरावर मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी निर्घृणपणे संपत यांचा दहा वर्षांच्या मुलाला आणि पत्नीला ठार मारलं. तर गंभीर जखमी झालेले संपत यांचे वृद्ध आई वडील खाजगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत.
मनमाड मधील एका दरोड्याच्या प्रकरणात मोका अंतर्गत या सहा जणांवर कारवाई सुरु आहे. त्या प्रकरणाची साक्ष द्यायला पोलीस महासंचालक संजीव दयाळ दोन दिवसापूर्वी नाशिक न्यायालयात हजार झाले होते. त्या प्रकरणाची सुनवणी झाल्या नंतर लगेचच इंदिरानगर पोलिसांनी या सहाही जणांना पाथर्डी दरोडा प्रकरणी ताब्यात घेतलं होतं.
प्राथमिक चौकशीसाठी यांना ताब्यात घेतलं असता त्यांच्या मोबाईलचं लोकेशन ठाणे जिल्हा दाखवत असताना ते चुकीची माहिती देत असल्यानं हेच मुख्य आरोपी असतील असा पोलिसांचा दावा आहे. त्यमुळे सहा दिवसांच्या पोलीस कोठडीच्या मुदतीत पोलिसांच्या हाती काय माहिती लागते याकडे नागरीकांच लक्ष लागलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.