अकोल्यात मेडीकल कॉलेजमध्ये रॅगिंग, गुन्हा दाखल

अकोल्यातल्या शासकीय मेडीकल कॉलेजमध्ये रॅगिंगचा प्रकार उघडकीस आलाय. आठ विद्यार्थ्यांच्याविरोधात रॅगिंगचे गुन्हे दाखल कऱण्यात आले आहेत. तसंच आरोपी विद्यार्थ्यांना कोर्टाचा निर्णय़ य़ेईपर्यंत कॉलेजमधून काढून टाकण्यात आलंय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 9, 2014, 02:42 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, अकोला
अकोल्यातल्या शासकीय मेडीकल कॉलेजमध्ये रॅगिंगचा प्रकार उघडकीस आलाय. आठ विद्यार्थ्यांच्याविरोधात रॅगिंगचे गुन्हे दाखल कऱण्यात आले आहेत. तसंच आरोपी विद्यार्थ्यांना कोर्टाचा निर्णय़ य़ेईपर्यंत कॉलेजमधून काढून टाकण्यात आलंय.
हे सर्व विद्यार्थी एमबीबीएसच्या दुस-या वर्षाला आहेत. या विद्यार्थ्यांनी पहिल्या वर्षाच्या ४० विद्यार्थ्यांची ३१ जानेवारीला कॉलेजच्या होस्टेलमध्ये रॅगिंग घेतली होती. पीडित विद्यार्थ्यांनी रॅगिंगची तक्रार केल्यानंतर कॉलेजनं चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली.
या समितीच्या चौकशीत रॅगिंगची बाब उघड झाली. त्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांविरोधात रॅगिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा>