धुळे : जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांना ३५ हजाराची लाच घेतांना अटक करण्यात आली आहे. नंदा खुरपुडे यांना धुळे लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
शिंदखेडा तालुक्यातील व्यायाम शाळेला अनुदान वाटपासाठी श्रीमती खुरपुडे यांनी लाच मागितली होती.
जिल्हा क्रीडा संकुलात श्रीमती खुरपुडे यांच्या सहायक प्रभावती देवरे यांनी लाच स्वीकारली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई एवढ्या जलद केली की कार्यालयात बसलेल्या कर्मचाऱ्यांना काही कळालंच नाही.
जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात अनेक अधिकारी लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.