गुपीत धनाचं 'पितळ' उघड

खोदकाम करताना जमिनीत पुरलेलं पुरातन सोनं सापडलं असून ते कमी किंमतीत विक्री करण्याचं आमीष..

Updated: Dec 23, 2015, 11:18 PM IST
गुपीत धनाचं 'पितळ' उघड title=

नाशिक : खोदकाम करताना जमिनीत पुरलेलं पुरातन सोनं सापडलं असून ते कमी किंमतीत विक्री करण्याचं आमीष दाखवून नागरिकांना गंडा घालणा-या तिघांना नाशिक पोलिसांनी गडाआड केलंय. मात्र शहरातल्या महिलांना अजूनही असे फोन कॉल्स येत आहेत. 

जमिनीखाली पुरातन सोनं मिळालंय. ते स्वस्तात विकत घ्या असे फोन कॉल्स अनेकांना आलेत. कमी किंमतीच्या आमीषाला अनेक जण बळी पडले. सुरूवातीला थोडं खरं सोनं दाखवून सौदा ठरल्यावर बनावट दागिने, मण्यांचे हार, अंगठी देऊन लाखो रूपयांना अनेकांना लुटण्यात आलं. अखेर पोलिसांनी ब्राह्मणवाडे गावातून 5 किलोच्या बनावट सोन्यासह तिघांना ताब्यात घेतलं. त्यांचे दोन साथीदार मात्र फरार झाले. 

राज्याच्या इतर भागातही अनेकांना अजून असे फोन येत आहेत. पण गंमत अशी की सोन्याची भूरळ नागरिकांनाच एवढी पडते की स्वस्तात सोन्याच्या लोभापायी आंधळे झालेले सहज सावज होतात. त्यामुळे अशा आमीषांना बळी न पडता थोडी सदसदविवेकबुद्धी नागरिकांनीही वापरण्याची गरज आहे.