नाशिकच्या अर्चनाची हॉलिवूडमध्ये भरारी!

हॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली तर? विचारच आनंददाय वाटतो ना! पण, जर खरोखरच अशी संधी प्राप्त झाली तर... होय, अशीच संधी मिळालीय नाशिकच्या अर्चना पाटील हिला... नव्हे, तिनं ही संधी प्रचंड मेहनत करून मिळवलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 8, 2013, 01:26 PM IST

www.24taas.com, नाशिक
हॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली तर? विचारच आनंददाय वाटतो ना! पण, जर खरोखरच अशी संधी प्राप्त झाली तर... होय, अशीच संधी मिळालीय नाशिकच्या अर्चना पाटील हिला... नव्हे, तिनं ही संधी प्रचंड मेहनत करून मिळवलीय.
मूळची नाशिककर असलेल्या अर्चनाने नाशिकमध्येच इंजिनीअरिंगपर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर पुण्यात जाऊन नोकरी केली. मात्र, बहिण अंजली पाटील प्रमाणेच कला जगतात करिअर करायची इच्छा तिला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे तिने थेटलॉस एंजेलिस गाठून तिथे सिनेमा दिग्दर्शनाचे शिक्षण घेतले. इंजिनीअरिंग केल्यानं तांत्रिक ज्ञानही चांगलंच होतं. मग, दिग्दर्शनाबरोबरच एडिटींगचाही ध्यास तिनं घेतला. आणि आता तर एडिटींगमध्येच तिनं आपल्या करिअरला ढकलून दिलंय. एडिटिंगमधील बारकावे व दिग्दर्शकाला अपेक्षित असलेला प्रसंग उतरवण्यात अर्चनाद्वारे घेतली जाणारी मेहनत हॉलिवूडमधील दिग्दर्शकांमध्ये चर्चेत आहे.
‘मोशन पिक्चर्स’चे एडिटिंग करणाऱ्या अर्चनाने हॉलिवूडमधील २० हून अधिक शॉर्ट फिल्म तसंच दोन सिनेमांचे एडिटिंग करत इंडस्ट्रीची वाहवा मिळवली आहे. त्यापैकी फिफ्थ अँड अलमेडा, ग्रीन बँगल्स, ग्रॅटिट्यूड, द कॉफिअर या शॉर्ट फिल्म्सना आंतरराष्ट्रीय नामांकनंही मिळाली आहेत. त्यातही ग्रीन बँगल्स १५ देशांतील ४४ शहरांत दाखवला गेला आहे, तर द कॉफिअरचेकान्स फिल्म फेस्टिवलमध्ये स्क्रिनिंग करण्यात आलं. रॅडिकल्स आणि मॉबस्टर किड्स हे दोन सिनेमेही अर्चनाने एडिट केले असून ती सध्या तिसऱ्या सिनेमावरती काम करतेय.

लिखाणाची आवड असल्यानं अर्चना स्क्रिप्टही लिहिणारी अर्चना म्हणते, ‘एडिटिंग कितीही मन लावून, मेहनतीने केले आणि तुमच्या सिनेमाची स्क्रिप्ट दमदार नसेल तर एडिटिंग व्यर्थ आहे’. ‘ग्रीन बँगल्स’या शॉर्टफिल्मचं स्क्रिप्टिंग, एडिटींग आणि दिग्दर्शनही अर्चनानंच केलंय.
पण, सध्या अमेरिकेतल्या दुसऱ्या क्रमांकाच्या शहरात म्हणजेच लॉस एन्जेलिसमध्ये स्थिरावलेली अर्चना नाशिकच्या मोकळ्या हवेला आणि सूर्यप्रकाशाला मात्र खूप मिस् करतेय.