मुलीच्या छेडछाडीवरून दोन गटात तुफान दगडफेक

जुने नाशिक परिसरात शाळकरी मुलांमधल्या वादाचं पर्यवसान वाहनांची तोडफोड आणि दगडफेकीत झालं. मुलीची छेड काढण्यावरून हा प्रकार घडला.

Updated: Jan 17, 2013, 12:54 PM IST

www.24taas.com, नाशिक
जुने नाशिक परिसरात शाळकरी मुलांमधल्या वादाचं पर्यवसान वाहनांची तोडफोड आणि दगडफेकीत झालं. मुलीची छेड काढण्यावरून हा प्रकार घडला. यात चौघे किरकोळ जखमी झालेत. काही वाहनांचं नुकसान झालंय. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पोलिसांनी म्हटलंय.
एका अल्पवयीन मुलीकडे काही मुलांनी मोबाईल नंबर मागितल्याच्या कारणावरून रात्री नऊ वाजेच्या सुमारास शिवाजी चौकात या वादाला सुरूवात झाली. त्यानंतर यावर वाद घालत दोन्ही गट एकमेकांवर चालून आले आणि त्यांनी एकमेकांवर जोरदार दगडफेक केली.

या दगडफेकीत एका पोलीस कर्मचाऱ्यासह अन्य तीन जण जखमी झाले. तर धुमश्चक्रीत चौदा वाहनांचं नुकसान झालं. यात दहा मोटारसायकल आणि चार कारचा समावेश आहे. याशिवाय पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक करण्याचा प्रयत्न यावेळी झाला.