धोडप किल्ल्यावर ट्रेकरचा गूढ मृत्यू

नाशिक जिल्ह्यातल्या धोडप किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या श्रीकृष्ण सामक यांचा मृत्यू झालाय. ते मुळचे पुण्याचे आहेत. श्रीकृष्ण सामक आणि त्याचे तीन मित्र ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या काळात ट्रेकिंसाठी नाशिक जिल्ह्यातल्या धोपड किल्ल्यावर गेले होते.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 10, 2012, 10:02 PM IST

www.24taas.com, नाशिक
नाशिक जिल्ह्यातल्या धोडप किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या श्रीकृष्ण सामक यांचा मृत्यू झालाय. ते मुळचे पुण्याचे आहेत. श्रीकृष्ण सामक आणि त्याचे तीन मित्र ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या काळात ट्रेकिंसाठी नाशिक जिल्ह्यातल्या धोपड किल्ल्यावर गेले होते. २ डिसेंबरला हे सगळे जण धोडप किल्ल्यावर मुक्कामी गेले. त्यावेळी श्रीकृष्ण सामक त्यांच्या मित्रांबरोबर मंदिरात मुक्कामासाठी न जाता, किल्ल्यावरच राहिले. आणि थेट पुण्यात भेटू असं त्यांनी त्यांच्या मित्रांना सांगितलं.
त्यानंतर त्यांचे तीनही मित्र पुण्याला परत आले. पण सामक परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी धोडप किल्ला गाठला आणि पिंजून काढला. त्यावेळी श्रीकृष्ण सामक यांचा मृतदेह आढळून आला. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला, त्याचा तपास पोलीस करत आहेत.
काही दिवसांपूर्वीच इगतपुरी तालुक्यात मुंबईतल्या एका गिर्यारोहकाचा मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर १५ दिवसांतच ही दुसरी घटना घडल्यानं गिर्यारोहकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.