अतिरेकी कारवायांविरोधात महिलांची तुकडी सज्ज

महिलांच्या सुरक्षेसाठी महिलांचीच एक तुकडी सज्ज झालीये. नाशिकच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात अत्याधुनिक शस्त्रांसासह 72 महिलांनी खास प्रशिक्षण घेतलंय.

Updated: Mar 17, 2013, 12:07 AM IST

www.24taas.com, नाशिक
महिलांच्या सुरक्षेसाठी महिलांचीच एक तुकडी सज्ज झालीये. नाशिकच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात अत्याधुनिक शस्त्रांसासह 72 महिलांनी खास प्रशिक्षण घेतलंय. या पहिल्या महिला तुकडीचा दीक्षांत सोहळा नाशिकमध्ये मोठ्या दिमाखात पार पडला... महिलांची सुरक्षितता बरोबरच अतिरेकी कारवाया बॉम्बशोधक पथकासह अत्याधुनिक तंत्रज्ञांच्या प्रशिक्षणामुळे सर्वच आव्हनांचा सामना करण्यासाठी महिलांची ही तुकडी सज्ज झालीये. महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या माध्यमातून अत्याधुनिक प्रशिक्षण घेवून ७२ महिला आरपीएफ जवान आता देशसेवेच व्रत निभावताना दिसणार आहेत.
सात महिन्यांच्या कठोर प्रशिक्षण नंतर महिलांच्या पहिल्या तुकडीचा दीक्षांत समारंभ रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोधकुमार जैन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. देशात होणारे महिलांवरचे अत्याचार, रेल्वे स्थानक आणि चालत्या रेल्वेत होणारी
महिलांची छेडछाड या सर्व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी या महिलांना खास प्रशिक्षण देण्यात आलंय. नाशिकच्या आरपीएफ प्रशिक्षण केंद्रातून आजपर्यंत तीन तुकड्या देशसेवेसाठी दाखल झाल्यात. मात्र ही चौथी तुकडी केवळ महिलांसाठी असल्यानं वैशिष्ठपूर्ण ठरलीय. या रणरागिणींच्या या अनोख्या जिद्दीला दाद द्यायलाच हवी...