सायना नेहवाल फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये

भारताची अव्वल बॅडमिंटनपटू साईना नेहवालने फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. साईनाने सेमीफायनमध्ये जर्मनीच्या ज्युलियन शेंक हिच्यावर २१-१९, २१-८ अशी मात केली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 28, 2012, 04:14 PM IST

www.24taas.comपॅरिस
भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालने फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. सायनाने सेमीफायनमध्ये जर्मनीच्या ज्युलियन शेंक हिच्यावर २१-१९, २१-८ अशी मात केली.
जागतिक बॅडमिंटन क्रमवारीमध्ये तिसऱ्या स्थानावर असलेल्या आणि ऑलिंपिक ब्राँझपदक विजेत्या साईनाला या स्पर्धेत अग्रमानांकन आहे. शनिवारी रात्री झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सायनाने शेंकचा ३६ मिनिटे चाललेल्या सामन्यात पराभव केला. सायनाने गेल्या दोन आठवड्यात दुसऱ्यांदा शेंकचा पराभव केला आहे. यापूर्वी डेन्मार्क ओपन स्पर्धेत तिचा पराभव केला होता.
सायनाने जागतिक क्रमवारीतील तिस-या स्थानावर असलेल्या थायलंडच्या रॅटचोनाक इन्थनॉनवर २२-२०,२२-२० अशी मात केली.भारताच्या फुलराणीने गेल्याच आठवड्यात डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेते जेतपद पटकावेले होते.