वेळापत्रक: भारत आणि वेस्टइंडिज क्रिकेट सीरिज

Updated: Sep 15, 2014, 08:46 PM IST
वेळापत्रक: भारत आणि वेस्टइंडिज क्रिकेट सीरिज title=

 

मुंबई : येत्या ऑक्टोबर महिन्यात वेस्ट इंडिज क्रिकेट टीम भारत दौऱ्यावर येतेय. या दरम्यान टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमध्ये पाच वनडे, तीन टेस्ट आणि एक टी-20 मॅच खेळल्या जाणार आहेत. या मॅचचं वेळापत्रक नुकतंच जाहीर झालंय.

मुंबईमध्ये प्रॅक्टिस मॅचपासून दौऱ्याची सुरुवात होणार आहे. वनडेची सुरूवात ही कोच्चीमध्ये 8 ऑक्टोबरला होणार असून दुसरी वनडे 11 ऑक्टोबरला होणारी नवी दिल्लीत होईल.

तर कटकमध्ये 22 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय टी-20 मॅच असेल. तसंच 25 ते 27 ऑक्टोबरला कानपूर टेस्टची प्रॅक्टिस मॅच होईल. 30 ऑक्टोबरला हैदराबादमध्ये पहिली टेस्ट खेळण्यात येणार आहे. ही टेस्ट मॅच 30 ऑक्टोबरपासून ते 3 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे आणि शेवटची टेस्ट मॅच ही 15 नोव्हेंबरपासून ते 19 नोव्हेंबरपर्यंत असणार आहेत.

    अभ्यास मॅच

मुंबई : 3 ऑक्टोबर : प्रॅक्टिस मॅच

मुंबई : 5 ऑक्टोबर : प्रॅक्टिस मॅच

  वनडे सीरिजचे वेळापत्रक

8 ऑक्टोबर - पहिली वनडे - कोच्ची

11 ऑक्टोबर -  दुसरी वनडे -  दिल्ली

14 ऑक्टोबर - तिसरी -  विशाखापट्टणम

17 ऑक्टोबर - चौथी वनडे -  धर्मशाळा

20 ऑक्टोबर – पाचवा वनडे – कोलकाता

22 ऑक्टोबर – टी-20 – आंतरराष्ट्रीय – कटक

25 ते 27 ऑक्टोबर - प्रॅक्टिस मॅच - कानपूर

   टेस्ट सीरिजचे वेळापत्रक

30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर पहिली टेस्ट (हैदराबाद)

7 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर दुसरी टेस्ट (बंगळुरू)

15 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर तिसरी टेस्ट (अहमदाबाद)

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.