ग्लास्गोः 20व्या राष्ट्रकुल स्पर्धेत हॅाकीच्या उपांत्य फेरीत भारतीय हॉकी संघानं शनिवारी झालेल्या न्यूझिलंड विरूद्ध सामन्यात विजय मिळवत अंतिम सामन्यात धडक मारलीय. भारताकडून आकाशदीप सिंग, रमनदीप सिंग आणि पाल सिंगने गोल करत हा विजय खेचून आणला.
उपांत्य सामन्यात भारतानं न्यूझिलंडचा 3-2नं पराभव केला. आता भारताचा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. नवी दिल्ली इथं झालेल्या 2010 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियानं भारताचा 8-0 असा पराभव केला होता.
भारतीय संघाचं या विजयामुळं किमान एक रौप्य पदक पक्क झालं आहे. पण ऑस्ट्रेलियावर विजय मिळवत पूर्वीच्या पराभवाचा बदला घेत या पदकाचा रंग बदलू शकतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.