फुटबॉल लीग- सचिन,गांगुलीकडे संघांची मालकी

इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत आठ फ्रेंचायजी सामील होणार आहेत. फ्रेंचायजींच्या मालकीची रविवारी आयएमजी-रिलायन्सकडून घोषणा करण्यात आली.

Updated: Apr 13, 2014, 11:25 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत आठ फ्रेंचायजी सामील होणार आहेत. फ्रेंचायजींच्या मालकीची रविवारी आयएमजी-रिलायन्सकडून घोषणा करण्यात आली. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कोची तर, सौरव गांगुलीने कोलकाता संघांची मालकी मिळविली.
या स्पर्धेच्या पहिल्या मोसमातील सामने सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान खेळविले जाणार आहेत. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता त्याने फुटबॉलकडे लक्ष वळविले आहे. त्याने पीव्हीपी व्हेंचर्सच्या साथीने कोची संघाची फ्रेंचायजी मिळविली आहे.
तर, माजी कर्णधार सौरव गांगुलीने त्याच्या घरच्या कोलकता संघाची फ्रेंचायजी मिळविली आहे. याबरोबर बॉलिवूडमधील काही अभिनेत्यांनीही संघांची फ्रेंचायजी मिळविली आहे. या बड्या स्टारमुळे या स्पर्धेलाही आयपीएलइतकीच प्रसिद्धी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या व्यावसायिक फुटबॉल लीगमधील संघांची मालकी मिळविण्यासाठी सुरू असलेली स्पर्धा पाहता भारत हा फुटबॉलमधील `निद्रिस्त ताकद` आहे, या `फिफा`चे अध्यक्ष सेप ब्लॅटर यांच्या वक्तव्याची जणू प्रचिती येत आहे.
फ्रेंचायजी
मुंबई - रणबीर कपूर आणि विमल पारेख
कोची - सचिन तेंडुलकर आणि पीव्हीपी व्हेंचर्स
कोलकता - सौरव गांगुली, हर्षवर्धन निओटीया, ऍटलिटीको मद्रीद, संजीव गोयंका आणि उत्सव पारेख
पुणे - सलमान खान, कपिल वाधवान आणि धिरज वाधवान
बंगळुर - द सन ग्रुप
दिल्ली - समीर मनचंदा यांचा डेन नेटवर्क
गोवा - वेणूगोपाळ धूत (व्हिडिओकॉन), दत्तराज साळगावकर आणि श्रीनिवास व्ही. डेंपो
गुवाहाटी - जॉन अब्राहम आणि शिलाँग लजाँग

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.