www.24taas.com, लंडन
लंडनच्या डिस्कोथेकमधून चोरीला गेलेल्या दोन ऑलिम्पिक पदकांपैकी एक सापडले आहे. चोराने इमानदारी दाखवत स्वतः हे पदक पोस्टाने पाठवले आहे.
लंडन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनच्या महिला हॉकी टीम मधील खेळाडून हन्ना मॅकलॉड हिचे पदक गेल्या शुक्रवारी एका पाकिटात पोस्टाने इंग्लिश हॉकी संघाच्या कार्यालयात आले. पाकिट पाठविणाऱ्याने आपला पत्ता पाठविला नाही.
हॉकीपटू मॅकलॉडच्या सांगण्यानुसार बकिंहॅम पॅलेस येथे राणी एलिजाबेथ द्वितीय यांच्या स्वागत समारंभानंतर एका क्लबमध्ये विजय साजरा करताना हे पदक चोरीला गेले होते. यावेळी नौका चालक एलेक्स पॅट्रिड्ज याचेही पदक हरवले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पॅट्रिड्ज आणि मॅकलॉड यांनी क्लबमध्ये आपले ब्लेझर उतरवून ठेवले होते. या ब्लेझरमध्ये पदकं होती. गेल्या बुधवारी हे दोघे इतर पदक विजेत्यांसह आनंद साजरा करत होते. पॅट्रिड्जने आपल्या ट्विटर अकौंउंटवर चोरीची माहिती दिली होती. त्यानंतर मॅकलॉडनेही ट्विट करून माझेही पदक याच वेळी गेल्याचे सांगितले होते.
या प्रकरणी गुरूवारी एका संशयीताला अटक करण्यात आली होती. दुसऱ्या पदकाचा आम्ही तपास लावू असे तपास अधिकाऱ्याने सांगितले आहे.