युवराजला ठरवू दे त्याला काय करायचं ते - धोनी

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीने म्हटंल आहे की, युवराज सिंग ज्याने कँन्सरसारख्या रोगाशी लढा देऊन त्यावर विजय मिळविला.

Updated: Nov 1, 2012, 03:44 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीने म्हटंल आहे की, युवराज सिंग ज्याने कँन्सरसारख्या रोगाशी लढा देऊन त्यावर विजय मिळविला. तर युवराज सिंग आपल्या स्वत:च्या फिटनेसविषयी चांगलच जाणून आहे.
धोनीने सांगितले की, युवराजला ठरवू दे की, टेस्ट मॅचसाठी तो तयार आहे की नाही, इंग्लंडसोबत होणाऱ्या चार टेस्ट मॅचच्या सीरिजच्या पहिल्या मॅचसाठी ५ नोव्हेंबरला टीम जाहीर करण्यात येणार आहे. आणि युवराज सिंग सहाव्या नंबरसाठी तगडा दावेदार आहे.

धोनीने म्हटलं आहे की, टेस्ट क्रिकेट वनडे मॅचपेक्षा अत्यंत वेगळं आहे. वनडेत ५० ओव्हर खेळाव्या लागतात. मात्र टेस्ट मॅच अनिश्चित स्वरूपाची असते. त्यामुळे युवराजला स्वत:चा निर्णय स्वत: घेऊ दे.