ब्राझीलमध्ये आजपासून रंगणार फुटबॉलपटूंचा महामेळा

ब्राझीलमध्ये फुटबॉलपटूंचा महामेळा रंगणार आहे. वर्ल्ड कप जिंकण्यासाठी 32 टीम्समध्ये लढत होत आहे. मोस्ट अवेटड असा फुटबॉल वर्ल्ड कप 12 जूनला कीक-स्टार्ट होणार आहे. जगभरातील 32 टीम्समध्ये फुटबॉल वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरण्यासाठी रेस लागणार आहे. फुटबॉलपटूंचा हा महामेळा फुटबॉलप्रेमींसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये कोणत्या ग्रुपमध्ये कोणत्या टीम्सचा समावेश असणार आहे. त्यावर एक नजर.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 12, 2014, 08:37 AM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, साओ पावलो
ब्राझीलमध्ये फुटबॉलपटूंचा महामेळा रंगणार आहे. वर्ल्ड कप जिंकण्यासाठी 32 टीम्समध्ये लढत होत आहे. मोस्ट अवेटड असा फुटबॉल वर्ल्ड कप 12 जूनला कीक-स्टार्ट होणार आहे. जगभरातील 32 टीम्समध्ये फुटबॉल वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरण्यासाठी रेस लागणार आहे. फुटबॉलपटूंचा हा महामेळा फुटबॉलप्रेमींसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये कोणत्या ग्रुपमध्ये कोणत्या टीम्सचा समावेश असणार आहे. त्यावर एक नजर.
आजपासून 32 देशातील फुटबॉलपटू फुटबॉल वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत. डिफेंडिंग चॅम्पियन्स स्पेन विजयासाठी फेव्हरिट आहेच. शिवाय यजमान ब्राझील, जर्मनी आणि अर्जेन्टीनाही या रेसमध्ये असणार आहेत.
ग्रुप ए मध्ये यजमान ब्राझील, क्रोएशिया, मेक्सिको आणि कॅमेरुनचा समावेश असणार आहे. यजमान ब्राझीलला सोपा ड्रॉ मिळालाय. त्यामुळे या ग्रुपमधून ब्राझीलची टीम टॉप 16 मध्ये टॉपवर असेल असं भाकित फुटबॉल पंडितांनी व्यक्त केलंय.
डिफेंडिंग चॅम्पियन्स स्पेन, धोकादायक नेदरलँड्स, भूरपूर गुणवत्ता असलेला चीली आणि ऑस्ट्रेलिया ग्रुप `बी`मध्ये आहे. त्यामुळेच डिफेंडिंग चॅम्पियन्सना आपल्या ग्रुपमध्ये अव्वल स्थानी येण्यासाठी चांगलाच घाम गाळावा लागेल.
ग्रुप सीमध्ये कोलम्बिया, ग्रीस, कोटी डी व्हीरो आणि जपान या टीम्सचा समावेश आहे. ग्रीसला या टीमधून टॉप 16 मध्ये आपलं स्थान पक्क करणं सोपं जाण्याची शक्यता आहे.
या वर्ल्ड कपमध्ये ग्रुप डी हा ग्रुप ऑफ डेथ आहे. या ग्रुपमध्ये ऊरुग्वे, कोस्टारिका, इंग्लंड आणि इटली या टीम्स आहेत. आतापर्यंत झालेल्या 19 वर्ल्ड कपमध्ये उरुग्वे, इंग्लंड आणि इटलीनं सात वर्ल्ड कप एकमेकांध्ये शेअर केले आहेत.
ग्रुप `ई`मध्ये स्वित्झर्लंड, इक्वेडोर, फ्रान्स आणि होंडुरास या टीममध्ये टॉप 16मध्ये स्थान पटकावण्यासाठी चुरस असणार आहे.
लिओनेल मेसीच्या अर्जेन्टाईन टीमला यावेळी इतरांच्या तुलनेत लीग मॅचेससाठी सोपा पेपर असणार आहे. त्यांना बोस्निया आणि हर्जेगोवेनिया, इराण आणि नायजेरियाशी मुकाबला करावा लागणार आहे.
विजेतेपदाच्या रेसेमध्ये असेलेल्या जर्मनीला ग्रुप `जी`मध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल, घाना आणि अमेरिकेशी दोन हात करावे लागणार आहेत. ग्रुप `एच`मधून बेल्जियम, अल्जेरिया, रशिया आणि कोरिया रिप्बलिKमध्ये लढत होईल.
फुटबॉलच्या महाकुंभात जगभरातील टॉप 32 टीम्समध्ये वर्ल्ड कपचं जेतेपद पटकावण्साठी मोठी चुरस असणार आहे. आता यामध्ये कोणती टीम बाजी मारते ते पाहण महत्त्वाच ठरणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.