www.24taas.com, नवी दिल्ली
विजय कुमार आणि योगेश्वर दत्तला राष्ट्रपतींकडून खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. 7.5 लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप असणार आहे.
विजय कुमारनं 25 मीटर पिस्तल प्रकारात ऑलिम्पिकमध्ये भारताला सिल्व्हर मेडल पटकान दिलं होतं. तर योगेश्वर दत्तनं 60 किलो वजनीगटात ब्राँझ मेडलची कमाई केली होती. त्याच्या या शानदार कामगिरीमुळेच त्यांना क्रीडा जगतातील हा पुरस्कार देण्यात आला.
युवराजला अर्जुन पुरस्कार
टीम इंडियाचा ऑल राऊंडर युवराज सिंगला नवी दिल्लीत अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आल. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 2011 चा वर्ल्ड कप मिळवून देण्यात युवराज सिंगने मोलाचे योगदान दिलय.
वर्ल्ड कपमध्ये युवराज हा `मॅन ऑफ द टूर्नामेंट`चा मानकरी ठरला होता. खेल रत्न आणि अर्जुन पुरस्कारांचं नवी दिल्लीत वितरण करण्यात आल त्यामध्ये एकमेव क्रिकेटपटू म्हणून युवराज सिंगचं समावेश होता.
महाराष्ट्राच्या कविता राऊताची अर्जुन पुरस्काराने सन्मान
कविता राऊतला अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात आलं. ऍथलेटीक्समध्ये केलेल्या चमकदार कामगिरीमुळेच तिला या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. 5 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असं या अर्जुन पुरस्काराचं स्वरुप आहे.
दिल्लीमध्ये तिला राष्ट्रपती प्रवण मुखर्जी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कवितानं एशियन गेम्समध्ये 10 हजार मीटर मध्ये ब्राँझ तर 5 हजार मीटरमध्ये सिल्व्हर मेडलची कमाई केली होती. तिच्या याच शानदार कामगिरीमुळे कविताला अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.