मेरी कोमचे नाव मणिपूरमधील रस्त्याला देणार

मणिपूर शासनाने चूडाचांदपूर जिल्ह्यातील एका रस्त्याला ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती बॉक्सर एमसी मेरीकोम हिचे नाव दिले.

Updated: Aug 29, 2012, 03:52 PM IST

www.24taas.com, इम्फाळ
मणिपूर शासनाने चूडाचांदपूर जिल्ह्यातील एका रस्त्याला ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती बॉक्सर एमसी मेरीकोम हिचे नाव दिले.
तिच्या सत्कारासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मणिपूरचे आरोग्यमंत्री टी फुंगजाथांग यांनी ही घोषणा केली. ‘मेरीकोम रिंग रोड’ असे त्या रस्त्याचे नामाकरण करण्यात आले आहे.
दरम्यान या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या ६४ वर्षीय डोंगरापाओ यांचा एका पोलीस कॉन्स्टेबलच्या बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याने मृत्यू झाला. कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे.