www.24taas.com, झी मीडिया,नवी दिल्ली
क्रिकेटमध्ये फिकिंग्स होते हे काही आता नवीन नाही मात्र आता कुस्तीसारख्या खेळामध्येही फिक्सिंगचं भूत आलंय. हे फिक्सिंगचं भूत छोट्या-मोठ्या स्पर्धांमध्ये नाही तर चक्क ऑलिम्पिकमध्ये सारख्या स्पर्धांमध्येही असल्याचा गौप्यस्फोट केलाय भारताच्या ऑलिम्पिक मेडलिस्ट सुशीलकुमारनं.
ऑलिम्पिकमध्ये भारताला दोन-दोन मेडल्सची कमाई करुन देणा-या सुशीललाही फिक्सर्सने तगडी ऑफर दिली होती. मात्र देशाला पैसा आणि इतर सर्वच गोष्टीं स्थान देणा-या सुशीलनं ही ऑफर धुडकाऊन लावली. २०१०च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनल बाऊटपूर्वी ती मॅच हारण्यासाठी सुशीलला मोठी रक्कम ऑफऱ करण्यात आली होती.
सुशीलकुमारने सांगितले की, एका रशियातील फिक्सरने मला ऑफर दिली होती. मात्र, मी धुडकावून दिली. फिक्सिंगबाबत सुशीलकुमारने उशिरा माहिती दिल्याने कुस्ती फेडरेशनने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत सुशीलकुमारला नोटीस पाठविण्याची तयारीही करण्यात आली आहे.
याआधी आयपीएल-६ सीजनमध्ये फिक्सिंगचा मामला उघड झाला होता. राजस्थान रॉयल्सचे तीन खेळाडूंना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर सुशीलकुमारने हा गौप्यस्फोट केल्याने कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.