अल्टिमेटमनंतर नाशिकमध्ये युती

नाशिक महापालिका निवडणुकीत एकला चलोची भूमिका घेऊन शिवसेनेला तिष्ठत ठेवणा-या भाजपची भूमिका मवाळ झाली आहे. शिवसेनेनं बुधवारी भाजपला २४ तासांच्या अल्टिमेटम दिल्यानंतर भाजप पदाधिका-यांनी शिवसेनेसोबत चर्चेची तयारी दाखविली.

Updated: Jan 21, 2012, 07:35 AM IST

www.24taas.com, नाशिक 

नाशिक महापालिका निवडणुकीत एकला चलोची भूमिका घेऊन शिवसेनेला तिष्ठत ठेवणा-या भाजपची भूमिका मवाळ झाली आहे. शिवसेनेनं बुधवारी भाजपला २४ तासांच्या अल्टिमेटम दिल्यानंतर भाजप पदाधिका-यांनी शिवसेनेसोबत चर्चेची तयारी दाखविली.

दरम्यान शिवसेनेनं अल्टिमेटमला मुदतवाढ देतानाच मित्रपक्ष आरपीआयबरोबर वाटाघाटीला सुरुवात केलीए. गुरुवारी भाजपच्या गैरहजेरीत शिवसेना आरपीआयच्या पदाधिका-यांमध्ये चर्चा झाली. यात आरपीआयनं ३० ते ३२जागांची मागणी केलीए. तर शिवसेनेनं आठ जागा देण्याची तयारी दाखविली असून  बैठकीची दुसरी फेरी होणार आहे.

[jwplayer mediaid="33190"]