अहमदनगर : झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी युवा फलंदाज अजिंक्य रहाणेची निवड होताच अजिंक्यच्या मूळगावी म्हणजे संगमनेर तालुक्यातील चंदनपुरीत जल्लोष साजरा करण्यात आला.
अजिंक्यची निवड काल जाहीर होताच गावातील ग्रामस्थांनी फटाके वाजवून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला असून त्याच्या भावी कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या आहेत. आजही अजिंक्य रहाणेची आजी, चुलते व चुलती गावाकडेच वास्तव्यास असून ग्रामस्थांनी या कुटुबियांचा सत्कार केलाय.
अजिंक्यचं बालपण संगमनेर तालुक्यातच गेलं. क्रिकेटमध्ये स्थिरावल्यानंतरही अजिंक्य गावाला विसरलेला नाही.
काही दिवसांपूर्वीच अजिंक्यने गावी आपल्या कुटुंबियांसाठी विशेषत: आजीसाठी बंगला बांधलाय. झहीर खाननंतर अजिंक्यच्या निवडीमुळे अहमदनगर जिल्हाच्या नाव पुन्हा उंचावल आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.