अजित पवारांची फटकेबाजी

पिंपरी चिंचवडमध्ये बऱ्याच दिवसांनी अजित पवार यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथले सर्व नेते एका व्यासपीठावर आले. सतत गटबाजीमध्ये गुरफटलेले हे नेते एकत्र आल्याची संधी साधत अजित पवार यांनीही जोरदार फटकेबाजी करत सर्व नेत्यांना एकत्र काम करण्याचा सल्ला दिला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 1, 2012, 08:08 PM IST

www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
पिंपरी चिंचवडमध्ये बऱ्याच दिवसांनी अजित पवार यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथले सर्व नेते एका व्यासपीठावर आले. सतत गटबाजीमध्ये गुरफटलेले हे नेते एकत्र आल्याची संधी साधत अजित पवार यांनीही जोरदार फटकेबाजी करत सर्व नेत्यांना एकत्र काम करण्याचा सल्ला दिला.
तीन आमदार, महापालिकेत एकहाती सत्ता आणि असंख्य ताकदवान स्थानिक नेते यामुळं पिंपरी-चिंचवड हा अजित पवारांचा नेहमीच बालेकिल्ला राहिलाय. पण या बालेकिल्ल्यातील गटबाजीचा राष्ट्रवादी कॉंग्रेसला लोकसभा निवडणुकीत फटका बसला. त्यामुळे हे नेते एकत्र काम करावेत अशी दादांना नेहमीच अपेक्षा असते. परंतु स्थानिक ताकद कायम ठेवण्यासाठी हेच स्थानिक नेते प्रसंगी दादानाही मानत नाहीत. नेमकी हीच बाब लक्षात घेवून दादांनी पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सर्वांनाच कानपिचक्या देत एकत्र काम करण्याचा सल्ला दिला.
एवढ्यावरच न थांबता दादांनी कार्यकर्त्यांना पक्षाची प्रतिमा डागाळली जाणार नाही याची खबरदारी घेण्याचा आदेशच दिला. विलास लांडे, लक्ष्मण जगताप,अन्ना बनसोडे, आझम पानसारे, योगेश बेहल अशी मोठी फौज पदरी असली तरी अजित पवारांची सर्व शक्ती पक्ष वाढवण्याऐवजी गटबाजी मिटवण्यातचं जातंय.