कधी होणार पुण्यातील धोकादायक वाडे रिकामे?

पुण्यातही धोकादायक इमारतींमध्ये हजारो लोक राहत असल्याची माहिती पुढे आलीय. विशेष म्हणजे यात महापालिकेच्या वसाहातींचीच संख्या जास्त आहे. महापालिका स्वतःच्याच वसाहतींकडे दुर्लक्ष करत असेल तर, सामान्य पुणेकरांनी महापालिकेकडून काय अपेक्षा ठेवायच्या, असा प्रश्न पुणेकर विचारतायत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 3, 2013, 08:54 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुण्यातही धोकादायक इमारतींमध्ये हजारो लोक राहत असल्याची माहिती पुढे आलीय. विशेष म्हणजे यात महापालिकेच्या वसाहातींचीच संख्या जास्त आहे. महापालिका स्वतःच्याच वसाहतींकडे दुर्लक्ष करत असेल तर, सामान्य पुणेकरांनी महापालिकेकडून काय अपेक्षा ठेवायच्या, असा प्रश्न पुणेकर विचारतायत.
धोकादायक इमारतींमध्ये पुण्यात पहिला नंबर लागतो तो जुन्या वाड्यांचा… दरवर्षी पावसाळ्यात वाड्याची भिंत किंवा वाडा कोसळण्याची एखाद-दुसरी घटना ठरलेलीच. यामध्ये अनेकवेळा जीवितहानीसुद्धा झालीय. मात्र असे धोकादायक वाडे पूर्णपणे रिकामे करण्यात महापालिकेला अजून तरी यश आलेलं नाही. पुण्यात सध्याच्या घडीला १७० अति धोकादायक वाडे आहेत तर २३० वाडे धोकादायक आहेत. या धोकादायक वाड्यांमध्ये सातशे कुटुंबं जीव मुठीत धरुन राहतायत.

धोकादायक वाडे खाजगी मालकीचे आहेत… त्यातही घर मालक आणि भाडेकरूंचे वाद आहेत. त्यामुळे महापालिकेला असे वाडे रिकामे करायला ब-याच मर्यादा येतात… महापालिकेच्या स्वतःच्या कर्मचारी वसाहतींचं मात्र तसं नाही. तरीही धोकादायक इमारती रिकाम्याही केल्या जात नाहीत आणि त्यांची पुनर्बांधणीही केली जात नाही. फक्त नावापुरती डागडुजी केली जाते. आणि त्यातही ठेकादार अव्वाच्या सव्वा बिलं महापालिकेला देतात. महापालिका कर्मचा-यांच्या धोकादायक वसाहतींची संख्यासुद्धा कमी नाही. महापालिकेच्या दहा वसाहती धोकादायक बनल्या आहेत. त्यामध्ये तब्बल सहा हजार लोक राहातायत.
स्वतःच्या वसाहतींची दुरुस्ती किंवा पुनर्निर्माण महापालिकेला वर्षानुवर्षे करता आलेलं नाही. उपाययोजना करायचं सोडून महापालिकेचे विभाग एकमेकांवर ही जबादारी ढकलतायत. त्यामुळे महापालिका एखाद्या दुर्घटनेची वाट पाहतेय का…. असा प्रश्न निर्माण झालाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.