पुण्यात डेंग्यूची वाढती साथ

पुण्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसें-दिवस वाढत आहे. पुणे महापालिका मात्र त्याबाबत फारशी गंभीर असल्याची दिसत नाही. कारण पावसाळ्यापूर्वी काढण्यात येणारी औषध फवारणीची निविदा पालिकेनं अध्याप प्रलंबित ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 8, 2012, 09:07 PM IST

www.24taas.com, पुणे
पुण्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसें-दिवस वाढत आहे. पुणे महापालिका मात्र त्याबाबत फारशी गंभीर असल्याची दिसत नाही. कारण पावसाळ्यापूर्वी काढण्यात येणारी औषध फवारणीची निविदा पालिकेनं अध्याप प्रलंबित ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपलब्ध तुटपुंज्या औषध साठ्याद्वारे पालिका डासांवर नियंत्रण आणू पाहतंय. यामुळे महापालिकेची पुणेकरांच्या आरोग्याबाबतची उदासिनता स्पष्ट झालीय. तर दुसरीकडं डेंग्यूनं बळी पडलेल्यांचा आकडा सातवर जाऊन पोहचलाय तर ६५५ रुग्णांना बाधा झालीय.
आश्चर्याची बाब म्हणजे ६५५ पैकी ५६ जण बुधवारी एका दिवसात बाधित झालेत. तर चालू नोव्हेंबर महिन्यात १८६ रुग्ण आढळलेत.