हेमा मालिनी म्हणाल्या, एकट्या घराबाहेर पडूच नका!

रेल्वेत होणारे महिलांवरील हल्ले तसेच मुंबई आणि दिल्लीतील सामूहिक बलात्कारानंतर महिला सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. स्त्रियांबाबतची मानसिकता बदलण्यावर भर दिला जात आहे. असे असताना महिलांनो तुम्ही एकट्यादुकट्या घराबाहेर पडू नका, नाहीतर अघटित घडू शकते, असा उपदेश भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांनी दिलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 29, 2013, 11:25 AM IST

www.24taas.com, झी मीडिया,पुणे
रेल्वेत होणारे महिलांवरील हल्ले तसेच मुंबई आणि दिल्लीतील सामूहिक बलात्कारानंतर महिला सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. स्त्रियांबाबतची मानसिकता बदलण्यावर भर दिला जात आहे. असे असताना महिलांनो तुम्ही एकट्यादुकट्या घराबाहेर पडू नका, नाहीतर अघटित घडू शकते, असा उपदेश भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांनी दिलाय.
हेमा मालिनी एका कार्यक्रमासाठी पुण्यात आल्या होत्या त्यावेळी महिलांना हा उपदेश दिला. महिलांना वाटत असेल की आपण वाटेल तिथे आपण जाऊ शकतो. पण आज ते शक्य नाही. कोठेही जाऊ शकतो, असे चुकूनही मनात आणू नका. ते आता सहज-सोपे राहिलेले नाही, असेही त्या म्हणाल्या.
वाढत्या घटनांमुळे महिलांचा सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे. महिलांनो एकट्यादुकट्या घराबाहेर पडू नका. अन्यथा तुमच्याबाबतीत काहीही अघटित घडू शकते. तुम्हाला माहित आहे की, कृष्ण हा द्रौपदीसाठी संकटकाळात धावून आला होता. पण आपल्या देवाने धाव घ्यावी इतके ‘भाग्यवान’ आपण नाही, असेही हेमा मालिनी यांनी म्हटले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.