मनसे-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांवर काल रात्री झालेल्या दगडफेक प्रकरणी मनसेच्या 150 तर राष्ट्रवादी काँग्रेस 80 कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी परस्परांवर दग़डफेक केल्याची पोलिसांत नोंद करण्यात आलीये.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 27, 2013, 01:00 PM IST

www.24taas.com, नगर
राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांवर काल रात्री झालेल्या दगडफेक प्रकरणी मनसेच्या 150 तर राष्ट्रवादी काँग्रेस 80 कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी परस्परांवर दग़डफेक केल्याची पोलिसांत नोंद करण्यात आलीये.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केल्याचा आरोप मनसेनं केलाय. अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार गावात ही घटना घडली. सध्या राज ठाकरे यांचा राज्याचा दौरा सुरु आहे.. या अंतर्गत भगवानगड इथून राज अहमदनगरकडे येत असताना हा प्रकार घडला..

गेल्या काही दिवसांपासून राज आणि अजित पवार यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे.. या पार्श्वभूमीवर राज यांचा काळे झेंडे दाखवून निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिंगार गावाजवळ मोठ्या संख्येने जमले होते त्या ठिकाणी राज यांचा ताफा येताच या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप मनसेनं केलाय. ..
या घटनेनंतर मनसैनिक आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते आमनेसामने आल्यानं काल रात्री परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. होतं. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना हटवण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला.