महिला पोलिसांच्या मुलांसाठी पहिलंवहिलं पाळणाघर

महिला पोलिसांच्या मुलांसाठी सांगलीत राज्यातलं पहिलंवहिलं पाळणाघर सुरू करण्यात आलं. गृहमंत्री आर आर पाटील यांच्या हस्ते त्याचं उदघाटन करण्यात आलं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 1, 2013, 05:41 PM IST

www.24Taas.com, झी मीडिया, सांगली
महिला पोलिसांच्या मुलांसाठी सांगलीत राज्यातलं पहिलंवहिलं पाळणाघर सुरू करण्यात आलं. गृहमंत्री आर आर पाटील यांच्या हस्ते त्याचं उदघाटन करण्यात आलं. मुलांसाठी संस्कार केंद्र, खेळणी तसंच भोजनाची सोयही इथे करण्यात आलीय.

इतर पाळणाघरांप्रमाणे वाटणा-या सांगलीमधल्या पाळणाघराची बात न्यारी आहे. कारण हे सांगलीमधल्या आहे महिला पोलिसांचं राज्यातलं पहिलंवहिलं पाळणाघर आहे. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद उराशी बाळगत महाराष्ट्रातल्या
रणरागिणी पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवत पोलीस खात्यात सेवा देत आहेत.
‘ऑन ड्युटी 24 तास’ काम करणा-या महिला पोलिसांना प्रसंगी आपल्या संसाराकडे, मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. चिमुकल्यांची जबाबदारी घरच्यांवर किंवा शेजा-यांवर सोपवत त्या आपलं कर्तव्य बजावतात. त्यामुळंच महिला पोलिसांच्या चिमुकल्यांसाठी सांगलीतल्या पहिलंवहिल्या पाळणाघराचं उदघाटन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी केलं. या उपक्रमाचं पोलीस दलातून स्वागत करण्यात येतंय..
अशा उपक्रमांमुळे चिमुकल्यांची काळजी मिटल्याने महिला पोलिसांचा आत्मविश्वास आणि हुरुप वाढण्यास नक्की मदत होईल यांत शंका नाही...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.